STORYMIRROR

Shubham Gawade Jadhav

Inspirational Others Children

3  

Shubham Gawade Jadhav

Inspirational Others Children

बाप

बाप

1 min
227

१२ महिने १८ काळ

कष्ट तुझ्या ५ वीला पूजलेलं

संकटांच्या वादळांनी

आयुष्य तुझं सजलेलं


नाही उसंत मिळत तुला

श्वास मोकळा घेण्यासाठी

कुठपर्यंत झिजणार तू

कुटुंबाच्या सुखासाठी


स्वतःची स्वप्ने गहाण ठेवलीस

मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी

राबत असतोस तू सदा

आनंदीत त्यांना ठेवाण्यासाठी


राबत राहणाऱ्या देहाला तुझ्या

अराम मिळणार कधी?

नेहमी स्वताः ऐवजी

कुटुंबाचाच विचार करतोस आधी


मनाला होणाऱ्या वेदना तू

काळजात दाबून ठेवतोस

अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन मग

एकटाच गहिवरून रडतोस


का? रे संगळ्यांनाच

 वाटत आईचं जास्त महत्व

 पडद्याआड आयुष्यभर राबणाऱ्या

 तुझं का? नाही जाणवत अस्तित्व 


Rate this content
Log in

More marathi poem from Shubham Gawade Jadhav

Similar marathi poem from Inspirational