निसर्गरम्य घर
निसर्गरम्य घर
सूर्य कसा डोकावितो
उंच ताड झाडातून |
सखे कोवळे किरण
निघतात नभातून ||१||
वाट पाही प्रवास्यांची
ऑटो चालक बसुन |
किती वेळ झाला तरी
नाही आले फिरकुन ||२||
वनश्रीने नटलेल्या
हिरवळ निसर्गात |
घरे उभी ती थाटाने
जशी आहेत स्वर्गात ||३||
राहू सखे आपण या
निसर्गरम्य घरात |
येई जेव्हा बाहेरुन
वाट पाहशी दारात ||४||