पावसाची सर
पावसाची सर
अवखळ पावसाची सर आली अण धुंद मन हे झाले
भिजली धरती, भिजल्या वाटा सर्व ओलेचिंब झाले
आकाशात इन्द्रधनुष्याने आपले सप्त रंग पसरले
हे पाहून सर्व धरतीवरती आनंदी आनंद पसरले
पावसाच्या येण्याने धरतीवर रंग नवे ते दिसले
झाडे हसली, वेली फुलल्या नविन गंध झाले
रखरखनारे दिवस जावुन हिरवळीचे दिवस आले
शांत झाली धरती आणि आज सुखाचे दिवस आले
वाट पाहणार्या चातकाने पावसाचे आभार मानले
मोर ही जंगलात गाऊनी नृत्य करु लागले
पावसाला पाहून बळीराजा ही खुश झाले
तपनार्या या धरतीवर आनंदाचे सोहळा झाले