STORYMIRROR

Nilofar Mulani

Others

3  

Nilofar Mulani

Others

समाजाने नकारलेली

समाजाने नकारलेली

1 min
238

स्त्री म्हणून जन्माला आली म्हणून नाकारली गेली ती

ए स्त्री जन्मा तुझी कहाणी ती

जन्माला आली समाजाने नकारले

घरच्यांनी पण पोरके केले

स्त्री म्हणून येणे हे काय चुक होते

यात पुरुषही बरोबरचे भागीदार होते

का स्त्री तुला नाकारले जाते

तिच्याच तर उदरात हे जग जन्म घेते

माता म्हणुन पुजले ही जाते

आणि घरात तिला खुंटीला बांधले जाते

जन्माने तिच्या लक्ष्मी घरी येते

का हे फक्त काहीजणांना कळते

सर्वाना सुख मिळत नाही मुलीचे

आई बहिण सुन बायको किती रुप आहेत मुलीचे

सर्वच रुपात स्त्री आपले कर्तव्य निभवते

आजही काही ठिकाणी तीला शोभेची बाहुली नाव दिले जाते

स्वत:चे सुख न पाहता झटते घरासाठी

ए स्त्री खुप दुर्देवी आहे तुझी कहाणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन