STORYMIRROR

Nilofar Mulani

Tragedy Inspirational Others

3  

Nilofar Mulani

Tragedy Inspirational Others

स्त्री पुरुष समानता नावापुरती

स्त्री पुरुष समानता नावापुरती

1 min
275

स्त्री पुरुष समानता हक्क फक्त नावापुरताच दिला

कमावते घरासाठी स्त्रीही पण खर्चण्याचा हक्क फक्त पुरुषाला दिला

घर सांभाळते सर्व बघते तरिही तिची अवहेलनाच होते

तू काय करते हेच तिला नेहमी विचारले जाते

आई बहिण बायको कोणत्याही रुपात ती असो

तिच्यावर हक्क गाजवण्याचा अधिकार पुरुषांकडे का असतो

समाजात तिनेही नाव कमवले हे का विसरुन जाता

तिच्याच तर उदरातून तुम्ही जन्म घेता

पुरुषत्वाचा माज का स्त्रीयांवर दाखवता

स्त्रियांच जग फक्त घरापर्यंत आहे हेच नेहमी का भासवता

आजची स्त्री स्वतंत्र असुन स्वतंत्र ती नाही

का मनमोकळे जगणे तिला जमनार नाही

डोक्यावर पदर, हातात बांगड्या नजरेचीही सीमा

काही स्त्रिया चंद्रावर गेल्या तरी काहींवर बंधनाच्या सीमा

स्त्री पुरुष समानतेचा काही ठिकाणी खुप उत्तम उदाहरण आहे

काही ठिकाणी स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल पुरतेच आहे

प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उत्तम कार्यरत आहेत

पुरुषांबरोबर त्याही कार्य चोख बजावत आहेत

स्त्री पुरुष समानता खूप ठिकाणी आहे

परंतु काही ठिकाणी फ़क्त पुरुषांचीच सत्ता आहे

स्त्री पुरुष समानतेला सलाम मी करिते

काही चुकले असेल तर माफी मागते


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Tragedy