STORYMIRROR

Nilofar Mulani

Romance

3  

Nilofar Mulani

Romance

पाऊस आणि आठवण

पाऊस आणि आठवण

1 min
312

पाऊस आला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या

बसल्या बसल्या डोळ्यातही अश्रुंचा पाऊस आला

रिमझिम येणारा पाऊसही आज बेधुंद बरसून गेला

विरहाच्या वेदनांच्या खपलीवर तो फुंकर मारुन गेला


आठवतो का पहिला पाऊस तो बेधुंद बरसणारा

तू होता माझ्या सोबत माझा बनून मोठा सहारा

ती गाडीवरची सफर आणि गार गार तो वारा

तुझ्या खांद्यावर डोकं ठेऊन अनुभवले ते सारे


आज आला मोठा पाऊस आणि आठवून गेले सारे

विरहाच्या वेदनेचे तेच तर आहेत माझे सहारे

आठवून सर्व आज मला मिळाले चैतन्य मला रे

हा कोरोना जाऊन कधी भेटू आपण तू सांग ना रे..........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance