STORYMIRROR

Nilofar Mulani

Romance

3  

Nilofar Mulani

Romance

फक्त तू

फक्त तू

1 min
441

तुझ्या प्रेमात मन हे इतके गुंतले

कळले नाही कधी तुझ्यात हरवले

स्वप्नानच्या जगात तू मला अलगत नेले

तुझ्यातच मी सर्वस्वी हरवले

तू नसताना तू असण्याची भास होऊ लागले

तुझ्या प्रेमात सख्या रे इतकी मी हरवले

स्वप्न आहे की आभास तू खरच नाही समजले

तू जवळ येताच हृदयाचे ठोके नेहमी चुकले

हाती तुझ्या माझा हात माझा अलगत जेव्हा आला

जिंकले सर्व जग मी असे मनातून हळुच आवाज आला

आता तुझी साथ मला आहे रे पुढच्या सात जन्मासाठी

तुच माझा सखा आता नी तुच माझा सोबती......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance