STORYMIRROR

Nilofar Mulani

Others

3  

Nilofar Mulani

Others

आनंदाचा अर्थ

आनंदाचा अर्थ

1 min
212

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

मी सकाळच्या ऊन्हात ठणठणीत जागी आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

सर्वांच्या सुखात मी माझे सुख शोधते आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

आई बाबांचा आशिर्वादाचा हात आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

माझ्या बाळाच्या चेहर्यावर नेहमी समाधान आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

लोकांच्या गर्दीत माझ्याबद्दल चांगले बोलणारे कोणितरी आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

साथ देणार्या जोडीदाराला माझ्यावर विश्वास आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

जिवाला जीव देणारा दोस्त मंडळी सोबत आहे

आनंदाचा खरा अर्थ तो आहे जेव्हा

प्रेम आपुलकी दाखवणारी माणसे माझ्यासोबत आहेत


Rate this content
Log in