STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

दवबिंदू

दवबिंदू

1 min
519

इवलासा दवबिंदू हा सरीतून भिजलेल्या 

दव थेंबानी पानाफुलांवर सजलेला

कोवळ्या किरणात न्हाऊन सौंदर्याने जणू नटलेला


 पानांवरून अलगद ओघळतांना 

 मोती समजून फसेल का कोणी...?

या आशेवर हा रमलेला 


क्षितीजाच्या ओंजळीतून गपचूप निसटून

हिरव्यागर्द पानांवर मोत्यांचा साज लेऊनी 

 असतो हा निवांत विसावलेला  


पावसाची येण्या-जाण्याची चाहूल 

कोवळ्या सोनेरी उन्हात अमृतापरी जणू हा जन्मलेला 

रवीच्या तेजोमय किरणात चैतन्य उजळून येता खळखळून भावनेतून शब्द पिसारयाने हा फुललेला


क्षणभंगुर जरी, 

 सौंदर्य सारे आपल्या अंतरात,

सृष्टीस हा व्यापून स्वताचे अस्तित्व सप्तरंगात जणू गोठलेला 


निसर्गाची ही किमया अन् नक्षीदार कला 

पाना फुलांवर, वेलीवरी साज प्रीतीचा रंग 

दिसे नवा चढलेला


वाटे हळूवार जपावे या सोनेरी क्षणांना  

जवळ जाऊनी निरखून बघता दिसे

सारी सृष्टी दवबिंदू सह स्मित हास्य करतांना 


विलक्षण आनंद होई मना दवबिंदुनी

भिजलेल्या पानांवरच्या मोतींची आरास ही बघतांना


रमणीय असे ऊन-पावसाचा सप्तरंगी हा सोहळा

 कधी सोनेरी ऊन असेल 

तर कधी दिसावा मेघ सावळा 

इवलासा दवबिंदू हा तरी दिसे साजरा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy