म्हातारपण!
म्हातारपण!
म्हातारपण म्हणजे आयुष्याची सांजवेळ
शांत वाऱ्याची असतो तिचा मेळ
म्हातारपण म्हणजे रेल्वेचा शेवटचा डब्बा
साखळी साखळी जोडून असतो मागे उभा
म्हातारपण म्हणजे वहीचे भरलेले पान
प्रत्येक गोष्टीचे असते त्यांकडे ज्ञान
म्हातारपण म्हणजे कोमेजलेले फुल
समज नसलेले नादान इवलेेसे मुल
म्हातारपण म्हणजे मावळणारा रवि
आनंदाचे प्रत्येक क्षण असते मनी
म्हातारपण म्हणजे समुद्राच्या अथांग लाटा
गप्पा गोष्टींचा असतो त्यांच्याकडे खूप साठा
म्हातारपण म्हणजे झाडाच पिकलेले पान
एकांतरीत ओसाड पडलेलंं रान
म्हातारपण म्हणजे जणू दुसरे बालपण
हवे असते त्यात माया जिव्हाळा आपलेपण
