पाऊस
पाऊस
1 min
130
कधी कधी येशील रे तू
दररोज मनी ही आशा
एकटक फक्त बघू नको
होई आम्हां शेतकऱ्यांची निराशा
आसुसलेली माय ही
घेऊनी कोरड्या मातीचा सांज
नदी कोरडी विहीर कोरडी
तहानलेल शेत माझं
विश्वास आहे अजूनही तुझ्यावर
त्या शेतकरी राजाचा
दररोज फक्त आभाळ दाखवी
मग पाऊस तू कशाचा ?
नको मोडू तू माझ्या
मनी असलेली ती आस
जोमाने बरसुन जा
दाखव पावसाचा श्रावण मास
तुझ्या दोरीवर थांबलेली
ही कोरड धरती
होई तेव्हा प्रत्येक मनी आनंद
विहीर, तलाव जेव्हा पाण्याने भरती
टाळ्यांसोबत ऐकू दे आता
तुझ्या थेंबा थेंबांचा सुरू
तू आला तर होईल शेत माझे
आषाढीचे पंढरपूर
