महाराष्ट्र माझी शान
महाराष्ट्र माझी शान
संस्कृतीने नटलेला महाराष्ट्र माझा
मराठी माणसाच्या मनामनातील राजा
संत शाहिरांच्या साहित्यांची खान
त्या शब्दाने महाराष्ट्राची उंचावते मान
स्वराज्य स्थापन करणारे धुरंदर शिवराय
प्रत्येक माऊलीमध्ये दिसे त्यांना त्यांची माय
आनंदाचा सूर्यनारायण उगवणारी पहाट
तेज किरणांचे असे त्याला साथ
इतिहासाच्या घटना जशी दगडावर काळी रेघ
असा माझा कणखर महाराष्ट्र देश
श्रमिक, कामगार, शेतकरी यांच्या हातापायाची धूळ
हेच वर्णन माझ्या महाराष्ट्राचे मूळ
महाराष्ट्र आहे माझा
गर्व आहे मजला
पारंपारिक संस्कृतीने नटलेल्या
देशा शतशः नमन तुजला
