प्रवास आयुष्याचा
प्रवास आयुष्याचा
आयुष्याचा प्रवास
हा खुप सोपा असतो
थोडेसे समजून घेतल्यास
मेळ त्याच्याशी बसतो
आयुष्याच्या पानावर
प्रत्येक क्षण नव्याने लिहायचा
दुःखाचा भूतकाळ
हळूहळू करून विसरायचा
आयुष्याचा प्रवास
उसळणारी लाट
सुखदुःख, आनंदाने
क्षणोक्षणी मांडलेला थाट
आयुष्याचा प्रवास
सायंकाळचे रूप
चारही दिशात शांतता
विसावलेली खूप
आयुष्याचा प्रवास
गारव्याची छाया
संगतीला सोबती असताना
जणू आपुलकीची माया
आयुष्याचा प्रवास म्हणजे
विविध गोष्टींनी दाटलेला
सगळ्याच गोष्टी भूतकाळात सोबत
प्रत्येक पानात वाटलेल्या
