व्याख्या प्रेमाची
व्याख्या प्रेमाची
प्रेम हे रेल्वेच्या डब्याप्रमाणे असावे
लांब असून पण त्यात दुरावा नसावे
प्रेम हे नितळ पाण्याप्रमाणे असावे
एकमेकांविषयी खोट मनात नसावे
प्रेम हे शांत सांयकाळ प्रमाणे असावे
तिरस्काराची भावना मनी त्यात नसावे
प्रेम हे भावना समजणारे असावे
फक्त शब्द मांडणारे नसावे
प्रेम हे रिमझिम पावसाप्रमाणेे असावे
वादळी वाऱ्याप्रमाणे विखरणारे नसावे
प्रेम हे पहाटवाऱ्याप्रमाणे असावे
नकळत मनाला स्पर्श करणारे असावे
प्रेम हे अथांग सागराप्रमाणे असावे
वाद विवाद झााले तरी कमी न पडावे
प्रेम हे कादंबरी प्रमाणे असावे
सुखदुःख आनंद भावना समंजसपणा
या गोष्टींने दाटलेले असावे
प्रेम हे न अटणारे असते
ते म्हणजेच प्रेम असते
