जिद्द
जिद्द
उंच शिखरावरती ध्येय तुझे
मन राहू दे तुझे थाम
न घाबरता त्या शिखराला पार कर
जरा निघू दे घाम
खाचखळगे वाटत तुझ्या
अंधारलेल्या चारही दिशा
काळोखाशी झुंजत रहा
येईल तुझ्याही सोबतीला पाहटेची निशा
आयुष्याच्या पानावर
सत्याचा मार्ग तु धर
खोट्या जगाला बळी न पडता
उंच यशाने पान तुझे भर
ध्येय थोडे कठीण आहे
पण नको घेऊ माघार
सातत्य ठेवता कामात
येईल तुझ्याही जीवनास आकार
न डगमगता चाल तु
पायात राहू दे तुझ्या बळ
एक दिवस मिळेल तुला
तुझ्या कष्टाचे गोड फळ
यशस्वी जीवनाचा मंत्र
तुला त्या दिवशी समजेल
जिद्द म्हणजे नक्की काय असतं ?
तुला त्या दिवशी उमजेल
