भारत देशा
भारत देशा
विविध सांस्कृतिने नटलेल्या भारत देशा
साष्टांंग नमस्कार आहे माझा तुजला
विविध जाती धर्माच्या
माणुसकीने बांधिल्या गाठी
शूरवीरांचे खूप पराकष्ट झाले
ह्या मायभूमी साठी
अनेक ग्रंथ चरित्रे कादंबऱ्या
लेखिल्या त्या मजबूत हाती
अनेक संंत कवी शाहीर
होऊन गेले या माती
इतिहासाच्या अनेक घटना
जशी दगडावरची काळी रेष
असा माझा कणखर
हा भारत देश
अनेक धर्माच्या उत्सवाचे
गातात येथेे गाणे
माणुसकीचे या माती
पेरले आम्ही दाने
थोर मोठ्यांच्या पराक्रमाची
ती अनुभवी पायाची धूळ
हेच वर्णन आहे माझ्या
भारत देशाचे मूळ
भारत माझी माता
तो गर्व आहे मजला
पायावरती माथा टेकवून
शतशः नमन करते तुजला
