आठवणीतले गाव.
आठवणीतले गाव.
दूर वेशीच्या पलीकडे
होते माझे गाव
कृष्णाई होते
त्या गावाचे नाव.
घनदाट वानांनी
चालू व्हायची गावाची वाट
हिरवीगार हरळांची झुडपे
सोबतीला भरमसाठ.
भिंतीला भिंत लागून
होती प्रत्येकाची झोपडी
शाळेला जाताना गुडघ्या इतका फ्रॉक
आणि सोबतीला पिशवी कापडी.
कोंबड्यांची बाग आणि
पाखरांची किलबिलाट सकाळची वेळ
रात्री झोपण्यापूर्वी आजीची गोष्ट
दररोज असायचा तिच्याशी मेळ.
सुरपारंब्या आणि विटीदांडू
दररोजचे ठरवलेले खेळ
खेळात दंग होता निघून जाई
अभ्यासाचा ही वेळ
प्रत्येक गोष्टीत असायचा
आनंदाचा क्षण
छोट्या मोठ्या उत्साहात
आनंदी होई इवलुशे मन.
काळ बदलला
बदलत गेले गावातील भाव
आता फक्त राहिले मनी माझ्या
आठवणीतले गाव.
