आला हिवाळा
आला हिवाळा
1 min
152
भडक उष्णतेचा गेला उन्हाळा
पावसालाही आता हळूहळूू टाळा
जवळ जवळ येऊ लागली आता
गुलाबी थंडीचा हिवाळा.
आई आजीने विणलेल्या
स्वेटरचा मायेचा जिव्हाळा
आला आता आला
गुलाबी थंडीचा हिवाळा.
पावसाची रिमझिम गेली आता
उष्ण उन्हाळ्याला ही झाली मंदी
आली आता आली
गुलाबी थंडी.
रविवारी बाबांच्या ऑफिसला
असते रजा
कुटुंबासोबत भजी पाव खाण्याची
थंडीत असते एक वेगळीच मजा.
कुडकुडत सगळे
घराबाहेेर जातात
प्रत्येकजण थंडीमध्ये
गरमागरम भजी खातात .
आली आता थंडी
आली आता थंडी
गार वाऱ्यात मजा करण्याची
आली आता संधी.
