STORYMIRROR

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

3  

Sandhya Purushottam jadhav

Inspirational

रूप शब्दांचे

रूप शब्दांचे

1 min
169

कळेना आज लिहावे काय

कोऱ्या कोऱ्या कागदी

बघताना वाटेवरती

मन दाटून आले अगदी.


मनाच्या एका कोपऱ्यात

 होते काही दडलेले

आठवताना पुन्हा ते

वाटे जणू शब्द माझ्यावर रुसलेले.


मनातून माझ्या एक

शब्द दाटून आला

नशीब म्हणजे काय

क्षणांत दाखवून गेला.


वैविध्यतेने नटलेल्या

शब्द शब्दांचा हा घोळ

 रूप समजता त्यांचे

अंत मनी दबून राहिले खोल.


अनुभवाचे बोल सांगे

 नको दुःखी शब्द

ते शब्द झाले जणू

झिरलेले खराब वस्त्र.


अंत झाला विषयाचा

पण शब्द राहिले तसे

शेवटी नकळत शिकवून गेले

 शब्द भयंकर कसे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational