प्रवास
प्रवास
तीन अक्षरात असलेला
प्रवास हा शब्द
पण आयुष्याचा प्रवास जणू
सुखदुःखाचे पांघरलेले वस्त्र
आयुष्याच्या प्रवासात
दुःख सोडून द्यायचे काही
कारण कधी थांबेल हा प्रवास
तुला ही ठाऊक नाही
हिम्मत न हारता
कर खडतर प्रवास
कारण एक दिवस मिळेल
फळ त्याचे खास
खाच खळगे करणार स्वागत
पण नको मानू तू हार
मस्तकी ठेव शांती
लढाईला येऊ दे धार
आनंदाचा प्रवास
एक दिवस येईल तुझ्या वाटी
तेव्हा अभिमान वाटेल तुला
झुंज दिलेल्या भूतकाळासाठी
आयुष्याचा प्रवास असे
यश अपयशाचा मेळ
नकळत तुला कळत जाईल
आयुष्याचा हा खेळ
