जीवन एक कविता
जीवन एक कविता
जीवनाची कविता म्हणजे
अक्षरसुखाचे प्रसन्न हास्य !
मिळता शब्दांची अचूक मात्रा
लाभू देत नाही ती नैराश्य !
जीवनाची कविता म्हणजे...
सुख समाधानाची गाणी
मनाची सदैव करते मशागत
चैतन्य देई हो निशीदिनी
जीवनाची कविता म्हणजे...
झुळझुळ झ-याचे पाणी
षढ्रीपुंच्या त्याग करिता
बनते मधुर देव वाणी !
जीवनाच्या कवितेला लाभतो
कधी झगमगता जरतार
शिकवी काना मात्रा वेलांटीचे महत्व
जवळी येऊ देत नाही विकार
जीवनाची कविता शिकवी
सद्वर्तन सद्नीति सद्विचार
सद्विवेकाला अंगिकारिता
आयुष्याला मिळे आकार
जीवनाची कविता सांगते
स्वर व्यंजनाचे महत्व !
चि वरील अनुस्वार वगळता
जन्मप्रवास होई समाप्त
म्हणून सांगतो पुरुषोत्तम
जीवन कवितेचे नको लक्तरे
स्नेह सौख्य देत घेत जावे
चाखावी शब्दफणसाची गोड गरे!
