मुखकमल
मुखकमल
सखी पहाटेच्या त्या दवाने...
तन-मन ग् भिजते
प्रेमकिरणात न्हाऊनी
मुखकमल तुझे फूलते
कळी खुलता प्रीतिची
हृदयपुष्प दरवळे
वाटे आनंद पाखरु
कळी कळीवरी खेळे
सखी,तनपुष्पांच्या कोषी
गंध मिलनाचा प्रसवे
मकरंद प्याया ज्वानीचा
मन अधीर हे धावे
मनमोहीनी रुप तुझे
क्षणोक्षणी मोहविते
जणू होऊनी नक्षत्रमाला
शब्द तळी पाझरते

