फुलपाखरु
फुलपाखरु
रंगीबी रंगी सुंदर गोड,
फुलपाखराची नाही कशालाच तोड...
रंगाची ती उधळण पाहुन मन हरवते,
पाहुन तुझ्या अदा मन बहरते...
हळु हळु जाते प्रत्तेक फुलावर,
बघताच तुला पकडावेसे वाटते हळुवार...
छोटासा तू ए पाखरा कुठे कुठे फिरतो,
इकडून तिकदे नुसता भिरभिरतो..
प्रत्येक छबी तुझी बसली माझ्या मनात,
हरवून गेले रे पाखरा तुझ्या या रुपात...
छोटासा रे तु पाखरा छोटी तुझी वारी,
ने रे सोबत तुझ्या फिरू प्रत्येक फुलावरी...

