प्रवास...
प्रवास...
जीवनात असतो फार,
अस्थित आयुष्याचा प्रवास...
शिकवून जातो धडे जीवनाचे,
मोचक्याच काही क्षणात ...
अस्थिरावलेल्या वाटा अन
दोन चाकांची गाडी...
चुकली थोडी वाट जरी,
तर दूर नेऊन सोडी...
रस्त्याच्या भोवती झाडे,अन काटा
चढ उतारया च्या प्रवासात
भेटत नाहीत वाटा ...
प्रवास नाही सोप्पा अवघड
या जिवनाचा ,
क्षणात पाडतो खोटा चुकलेल्या पाऊलवाट ...
प्रवास आहे खोडकर
नाही सोप्पी वाट ,
अंधारलेली रात्र कधी तर,
कधी सुखाची आस...
जीवनात असतो प्रवास खडतर,
प्रत्येक वाटेवरी,
प्रयत्न केल्याने होते छान ,
ठेवा आशेवरी...
