आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच,
कोणाचे खडतर तर कुणाचे
असते चांगलेच संच..
अवघड यावर स्पर्धा फार
अवघड खुप वाट ,
कधी काळोसे दू:ख यावर
तर कधी हास्याची पहाट..
यावर टीकने खुप अवघड
नसते कुठलीच मजाक,
रंगमंचा वर येऊनच होतात
सर्व जन सजाक...
या रंगमंचावर भेटतात
खुप चेहरे,काही भेटतात चांगले तर
काहीचे कपटी असतात पेहरे...
रंगमंच आहे जिवन इथे
असतातखुप वेष, या
स्पर्धेत पुढे जाता जाता
वाढतात खुप द्वेष...
आयुष्य एक रंगमंच इथे संभाळून
चालवे, घसरलो जरी यावरती
तरी परत आत्मविश्वासाने उठावे
या रंगमंचावर भेटतात खुप
चेहरे प्रेमाचे, काही असतात सोबत
चालनारे,तर काही वाटेतच सोडून
देणारे...
विश्वास ठेवा स्वत:वर
आत्मविश्वासाने चला,
दु:खी होऊ नका कधी कारण
प्रत्येकात आहे एक ना एक कला..
