पावसा पावसा ये रे...
पावसा पावसा ये रे...
पावसा पावसा ये रे,
आनंद सारा दे रे....
रिमझिम रिमझिम पाऊस धारा,
धारया सोबती खेळतो वारा...
वारया ची बघा ही वाढली गोडी,
पाण्यात सोडु कागदाची होडी...
पाऊस पडता येई मातिचा सुगंध,
वासाने मग त्या मन होइल धुंद...
वारया सोबत येइल पाणी,
आनंदी होऊन गाऊ या गानी..
मन बघा कसे मग्न झाले,
पाण्यासोबती सलगन झाले..
पाण्यासोबती खेळतात पक्षी,
मग झाडावर दिसतात सुंदर नक्षी....
पावसा पावसा येरे,
आनंद सारा दे रे....
