मन...
मन...
शब्दांनी गुंफलेले,
प्रेमाने बांधलेले,
मन हे असे सगळयात सामावलेले...
दुःख जपते कधी,
कधी सुखाची आस
प्रेमात होते आनंदी,
तर कधी अश्रुंची लाट...
सर्व गोष्टीनी भरलेले
आशेच्या किरणावर जगनारे
मन एकमेव आहे ,
एकोनेक गोष्ट सामावलले...
मन म्हण्जे प्रेम,
आणी प्रेम म्हन्जे काळजी,
असते काळजी तिथेच
जिथे असतो विश्वास....
पण हेच सर्व तोडतात
मनाशीच भांडतात,
मोडून सर्व आशा
मनालाच तोडतात ...
मन जपने अवघड
तुटण्याची भीती ,
सर्वांचे जपत बसने म्हन्जे
कष्ट असते किती...
कोणावर ही टाकवे
किती मन ओवाळून,
शेवटी भेटते निराशा
पाहते शेवटी वळुन...
मनानेच किती
सर्वांसाठी मरावे,
किती दुनियेला सहन करुन
मग स्वता:मध्येच हरावे....
सगळेच मारतात दगड,
या टिचक्या मनावर
तुटते मग हरून
वाहते लाटांवर...
