जिवनाची दशा..
जिवनाची दशा..
खूप वेळा रडतो
खूप वेळा हसतो,
जीवन जगता जगता
खूप काही शिकतो...
अस्थिर असते कधी
तर,कधी असत्याचे,
भास मोडणारे असते कधी
तर,कधी संवेदना जागवनारे...
जीवन हे असेच असते....
आयुष्याच्या वाटेवरती कधी असते
भक्कम करणारे ,
थोड्या दूर जाताच क्षणात
आशा मोडणारे...
जीवन नाही थट्टा
कमकुवत आशेवरची,
जीवन आहे
प्रवास आयुष्याचा अस्थिर वाटेवरचा..
बालपणापासुन ते वृध्दत्वाचे,
जीवन असते तोडीमीडीचे
कधिही सोपे नसणारे...
लहानपणी असते खेळण्याचे खोपडे,
थोडे मोठे झाल्यावर बनते स्वप्नांतले
झोपडे ..
खुप कष्ट करुन होते ते साकार,
जीवन नाही सोपे,नसतो
कुणाचाच आधार...
एका वाटेवरती जिवनाच्या,
येते कुणीतरी
क्षणार्धात येउनी आयुष्यात
भास मोडुनी जाते सर्व काही...
प्रेम ,त्याग ,माया
येते आयुष्यात
थोडया वेळानी सोडून जाते
स्वता:लाच स्वत:च्या आयुष्यात...
जीवन असे आपुले
जसे चिमणीचे घरटे,
काडी काडी जमवुनी
मग स्वत:मध्ये हरते...
स्वत:लाच शोधावे स्वत:च्याच मनात
बघितलेली स्वप्ने हरवून जातात क्षणात...
आयुष्य हे असते तोडीमीडीचे,
जीवन जगू न देणारे शांतपणे
असते खूप खोडीचे ..
जीवन असे आपले
अवखळ पाण्याचा झरा,
कधी असतो शांत
तर कधी वाहतो सरासरा....
