किती शोधतेय मी तुला
किती शोधतेय मी तुला
गप्प आहेस तु,म्हणुन
श्वास माझा थांबला
तु रुसलास तर कंठ
माझा दाटून आला..
तु असा गेलास आयुष्यातुन,
की परत नाहीच आला..
किती शोधलय मी तुला
तु कुठे हरवून गेलास...
..किती शोधलय मी तुला...
त्या मोकळ्या आभाळात,
त्या चंद्राच्या प्रकाशात,
त्या मंद झुळकेच्या वारयात,
त्या धकधकत्या श्वासात....
किती शोधतेय मी तुला...!
माझ्या त्या प्रत्येक हसन्यात,
माझ्या त्या आशेच्या भासात,
एखाद्या पक्षाच्या आवाजात,
मंद समुद्राच्या लाटात,
किती शोधतोय मी तुला....!
माझ्या डोळ्यतल्या अश्रुंमध्ये,
माझ्या छोट्याश्या मनामध्ये,
माझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये,
माझ्या हरवलेल्या वाटेमध्ये ,
किती शोधतेय मी तुला...!
परत येशिल तु,
आशा आहे मनात...
आणिल तुला माझ्या,
आयुष्यात जिद्द आहे मनात....!
