पृथ्वीचा -हास
पृथ्वीचा -हास
अरे मानवा मानवा
माणूसकी जप आता
निसर्गाचा समतोल
टिकवून ठेव आता
अन्न वस्त्र निवारा
आहे निसर्गाची देण
पृथ्वी आपूली दाता
ठेव हिच शिकवण
नको होऊ स्वार्थी
नको करू रे कत्तल
झाडे लावू झाडे जगवू
करू वनांचे रक्षण
तुझ्याच अतिक्रमाणे
धरणी माता धोक्यात
सारे संजीव निर्जीव
पर्यावरण संकटात
नको करु हेळसांड
नको करु अतीलोभ
पशूपक्षी प्राणी सारे
अनमोल रत्न लाभ
नदि नाले सागरात
नको टाकू घाण कचरा
मलमूञ सांडपाणी
योग्य विल्हेवाट निचरा
