STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Tragedy Fantasy Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Tragedy Fantasy Inspirational

निसर्गाची शिकवण

निसर्गाची शिकवण

1 min
219

अरे मानवा मानवा

माणूसकी जप आता

निसर्गाचा समतोल

टिकवून ठेव आता


अन्न वस्त्र निवारा

आहे निसर्गाची देण 

पृथ्वी आपूली दाता

ठेव हिच शिकवण


नको होऊ स्वार्थी

नको करू रे कत्तल

झाडे लावू झाडे जगवू

करू वनांचे रक्षण


करू नको रे मानवा

निसर्गाचा अतिवापर

अवकाळी पावसाळा

करीतो आज कहर


तुझ्याच अतिक्रमाणे

धरणी माता धोक्यात

सारे संजीव निर्जीव

पर्यावरण संकटात


नको करु हेळसांड

नको करु अतीलोभ

पशूपक्षी प्राणी सारे

अनमोल रत्न लाभ


नदि नाले सागरात

नको टाकू घाण कचरा

मलमूञ सांडपाणी

योग्य विल्हेवाट निचरा


नैसर्गिक आपत्तीवर

उपाययोजना करूया

पर्यावरणाचे रक्षक

वसुंधराला वाचवू या


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy