माझी बहिण
माझी बहिण
हसणं इसरलो मी, असं काय काय पाही
आपल्या माणसा समोर, मी गप्प गप्प राही
काय सांगू काय बोलू, कोडं पडलंय या मनाला
ओक्साबोक्शी रडून झाल, लागलोय आता कामाला
मान माझी झूकन्या समर्थ, मोडून पडला माज
मोत्या सारखी आसवं माझी, चेहऱ्यावर चढला साज
फक्त पानी आहे डोळ्या, बाकी शब्द काही फुटेना
दाटून येते आठवण तुझी, श्वास मोकळा सुटेना
काहीही व्हाव्ह पण, शेवट नको मला
भोग सारे मला दे, सतत आनंदी पहायचय तुला
संकट सारी तळतील, थोडा वेळ जाऊ दे
साडेसाती माझ्या माथी, परी कायम तूझ्या दारी सुखं नांदू दे
सत्य होऊ दे माझे शब्द, परमेश्वर मी पाहीन
अस्त माझा व्हावा कधीही, पण कायम सुखांत राहावी माझी बहिण
