आई
आई
गोठ्यामध्ये गाय माझी
आहे वासराची आई
घसा हंबरूनी फोडे
धाई पाटलीन ... बाई ॥
माय घरामंदी माझ्या
प्रेम करे माझी .. आई
जाता येते 'घेते मुका
माय ताहनुल्याची आई ॥
काड्या कुड्या चोची मधी
विणे घरटं . . . चिऊताई
दाणा पाणी पिल्ला साठी
दूर देशी .... दूर . . . जाई
गोड .. माझी .. चिऊ ताई
गाणं . . . पिल्लांसाठी . . गाई
माया करे ..... आभाळभर
मोठी माझी ताई ..... माई
गाडी नको नको खेळणी
मला .... पाहीजे ..... आई
तीच्या .. कुशीत झोप येई
गोड ... गोड .. माझी आई
