कवडसा
कवडसा
खिडकीच्या पडद्याआडून उन्हाचा कवडसा आत आला,
अन रात्रीच्या थंडीत गारठलेली वेल तरारली।
नवीनच आलेली पालवी आळोखे पिळोखे देत ,
कुतूहलाने त्याच्याकडे झेपावली।
नाचणारा कवडसा वेलीला खुणावू लागला,
पाठशीवणीचा खेळ रंगात आला।
खेळता खेळता अचानक नाहीसा झाला,
पाठीमागून येणाऱ्या वेलीसाठी पाऊल खुणा सोडून...

