हरित तुरा
हरित तुरा
हे सग्यानो! रे खगांनो !
नादमधुर किलबिल करा
हे फुलानो फुलपाखरांनो
रंगांची लयलूट करा
हे दवबिंदूनो धरणी वर
ती बिलोरी बरसात करा
या रे सारे आज अंगणी
स्वागताचा जल्लोष करा
सुकलेल्या शाखेतून झरतो
चैतन्याचा हळूच झरा
कसा आगंतुक बघा उगवला
कोमल सुंदर हरित तुरा!
