नारी
नारी
जराशी लाजरी
थोडीशी बुजरी
नाजूक कळी
सुकुमार निरागस
सुन्दरा रूपगर्विता
संयमी अन् शांत
अवखळ खळखळ
तारुण्याची सळसळ
हट्टी मुजोर
कामिनी दामिनी
कितीक रूपे
कितीक पैलू
छोटीसी परी
गालातली खळी
कधी तू दुर्गा
कधी तू काली
कधी उद्धारी तर
कधी संहारी
कधी निर्झरा
कधी प्रलयंकारी
अवीट गोडी
असीम शांती
प्रेमळ नजर
कोमल कांती
हरणीची चाल
दुधारी तलवार
आदिमाया आदिशक्ती
अशी ही नारी
जगात भारी
अशी ही नारी
जगात भारी
