सोड ना
सोड ना
सोड ना ...
ही पांढऱ्या केसांची काळजी
कोणीतरी असेल....
जो फक्त
तुझ्या माथ्यावरच्या
टिकली वर मरत असेल
सोड ना ....
ही वाढणाऱ्या वजनाची काळजी
कोणीतरी असेल जो
फक्त तुझ्या सुंदर हृदयावर
मरत असेल
सोड ना ...
या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांची काळजी
कोणीतरी असेल जो
जो फक्त तुझ्या
गोड अशा हास्यावर मरत असेल
तू तेचं कर ज्याने तुला आनंद मिळेल
कोणीतरी असेल ना ...
जो तुझ्या आनंदावर मरत असेल

