आपली वसुंधरा
आपली वसुंधरा
वसुंधरा ही माता आपुली
आम्ही लेकरे तिची
पोषणकर्ती जरी आपुली
असे दयनीय स्थिती
वृक्षवल्ली अन् वनचरेही
तिला सारखीच प्रिय
आपण मात्र स्वार्थापोटी
कार्य करतो अप्रिय
कत्तल करता वृक्षाची ही
नष्ट होतसे वने
वन्यप्राणी ही प्रवेशती मग
गाव आणि उद्याने
पर्यावरणाचे रक्षण करण्या
व्हा कटिबध्द सारे
स्वतःपासुन सुरुवात करुया
बाळ गोपाळांनो यारे
