मैत्री
मैत्री
मैत्री हे मानवाला मिळालेलं
निसर्गाचं अलौकिक देणं
त्याच्याशिवाय जीवन केवळ
होईल बापुडवाणं.. १..
मैत्रीची संपत्ती असेल भरपूर
तर आयुष्य खरंच समृध्द होतं
हीच्याशिवाय बँक बॅलन्स असूनही
रिकामच असतं समाधानाचं खातं. २..
मैत्रीचे बंध खरोखर
अगदी अलौकिक असतात
सा-या नात्यांना ते हळुवारपणे
एकसुत्र बांधून ठेवतात.. ३…
मैत्रीत नाते आणू नये
नात्यात मैत्री शोधावी
त्यानेच नात्यांची इमारत
भरभक्कमफणे उभी रहावी.. ४..
वाळवी जर लागली हिला
अविश्वास अहंकाराची
दुर्दशा होते मग
मैत्रीच्या तरल वस्त्राची… ५..
त्याग हाच खरोखर
असतो मैत्रीचा पाया
त्यानेच दरवळतो मग
स्नेहाच्या अत्तराचा फाया.. ६..
व्यवहार आणि स्वार्थाचे बांध
तोडून हवेत टाकायला
त्यानेच मग मैत्रीची सरिता
झुळझुळ लागेल वहायला.. ७..
मैत्रीचा नंदादीप अखंड
तेवता ठेवायला हवा
दु:ख निराशेच्या खाचखळग्यातून
त्यानेच योग्य रस्ता दिसावा.. ८
