शब्दांनीच दूर केला
शब्दांनीच दूर केला
भावना वेगळी होती शब्दांनी घात केला
होता माणूस माझा शब्दांनीच दूर केला
न समजून घेता तोही निघून गेला
जोडला होता हृदयाशी शब्दांनी शेवटी शब्दांनीच दूर केला
दोन चांगल्या मनात गैरसमज डाव साधून गेला
अगणित गोड आठवणींचा शब्दांनीच धूर केला
होता जीव एकमेकांचा क्षणात वेगळा केला
शस्त्र राहिली मागे शब्दांनीच वार केला
छोट्याशा शब्दांनी विषय खूप मोठा केला
नुकताच फुललेला प्रेम वसंत शब्दांनीच गार केला
