STORYMIRROR

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

समाज काय म्हणेल??

समाज काय म्हणेल??

1 min
179

 किती दिवस अजून असं दुर्लक्षित करायचं

समाज काय म्हणेल या भितीपोटी उगा का मूक गिळून बसायचं


मागास विचारांंना, मनाविरुद्ध निर्णयांना का झेलायचं

समाज काय म्हणेल म्हणून उगा का अधीन रहायचं?


समाज काय म्हणेल??

अशी भिती अजून किती आणि का बाळगायची??

कारण,

समाज कायं काहीही केले तरी बोलतो चं

मगं या अशा समाजासाठी आपण 

आयुष्यामध्ये असलेला आनंद का गमवायचा??

समाजाला कवटाळून घेऊन का स्वतःला उगी त्रास द्यायचा? 


Rate this content
Log in