STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Inspirational Thriller

3  

Rutuja kulkarni

Abstract Inspirational Thriller

खरचं ती स्वतंत्र आहे का?

खरचं ती स्वतंत्र आहे का?

1 min
158

ती स्वतंत्र आहे असा बोलबाला आहे सर्वत्र

मात्र ती चं स्वातंत्र्य आहे कैद अजूनही

समाज नावाच्या गलेलठ्ठ पिंजर्‍यात

भिन्न लोकांच्या बुरसटलेल्या विचारांत

वासनेने बरबटलेल्या कैक नजरेत

आणि तीने सर्वस्व मानलेल्या 'त्या' च्या हातामध्ये


हो 'ती ' कैद आहे अजूनही

कुठे तीचं स्वातंत्र्यचं तिच्या जीवावर बेततेयं

तर कुठे तीचं स्वातंत्र्य कित्येकांच्या नजरेला खुपतेयं

आणि हेचं स्वातंत्र्य तीचं शील ठरवून मोकळं होतयं


हे एवढे सगळे असूनही

ती स्वतंत्र आहे असा बोलबाला होता

तिच्या स्वातंत्र्यावर मात्र तिचा काहीच हक्क नसतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract