Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rutuja kulkarni

Abstract Others

4  

Rutuja kulkarni

Abstract Others

आयुष्य सेलिब्रेट करायंला हवं

आयुष्य सेलिब्रेट करायंला हवं

2 mins
1.0K


तु खरचं खूप गोडं हसतेस

आणि तुझं हे हास्य तुझ्या सुंदरतेमध्ये विशेष भर घालते

हे खरं असलं तरीही समाजामध्ये वावरताना

माझं हे बिनधास्तपणे हसणं खटकतं अजूनही कित्येक नजरेतं

कारण मी एक मुलगी आहे

आणि चारचौघांत हे असे हसणे मुलींना शोभत नाही

असे हा समाज म्हणतो अजूनही


खरचं मला कळत नाही

नेमके या समाजाला माझ्याकडून नेमके कायं अपेक्षित आहे एक मुलगी म्हणून..??


एकीकडे मुलगा आणि मुलगी एकचं आहे

असे ठामपणे हा समाज म्हणतो

आणि समाजात वावरताना 'मुलगी आहेस तु', असे म्हणंत बंधन आणि नियम ही लादू पाहतो माझ्यावर,

समानतेची ही व्याख्या माझ्या समजण्यापलिकडे आहे खरचं.


मला ही समाजाची बंधने कधी रूचली चं नाहीत मुळी

कारण मला मुक्त जगायंला खूप आवडतं

माझ्या दिसण्यावर.. माझ्या कपड्यांवर..माझ्या विचारांवर वेळोवेळी मला हा समाज टोकतो

पण मला या समाजात वावरताना कधी संकोच वाटत नाही किंवा कधी कुठली न्युनता ही जाणवतं नाही

कारण मी माझं असणं स्वीकारलं आहे मनापासून


मी पुरूषांएवढीच सशक्त आहे

मी एक मुलगा पार पाडू शकतो एवढ्या जबाबदार्‍या पार पाडते

म्हणून हा समाज, 'मी बरोबरी करायचा प्रयत्न करतेयं, असेही म्हणतो मला

पण मी बरोबरी नाही करतं आहे

मी फक्त माझं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेयं हे या समाजाला मी वारंवार सांगूनही पटत नाही

कारण एका मुलीचं स्वतंत्र अस्तित्व स्वीकारणं या समाजाला अजूनही जडं चं जाते


मी अशीच आहे बिनधास्त

आणि मला माझं हे मुक्त जग जगताना

अजूनही हा समाज मला बंदिनी बनवू पाहतोयं

कधी माझे मुक्त विचार किती चुकीचे आहे असे सांगून तर

कधी माझ्या स्वच्छंदी वागण्यावर अमुक अमुक प्रकारच्या चारित्र्याचे लेबल लावून

तर कधी माझ्या स्वैर लिखाणावर प्रतिक्रिया व्यक्त करून

हा समाज मला आणि माझ्या सारख्या कित्येक, 'ती', ला एका विशिष्ट सीमेमध्ये बांधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो

आपण एक मुलगी,

एक स्त्री म्हणून वावरताना फक्त ही समाज नावाची भिती मनातून काढून टाकायला हवी 

कारण हा समाज आपल्या ज्या सौंदर्यावरून आणि हसण्यावरून आपल्याला टोकू पाहतोय 

खरतर ते आपलं सौंदर्य आणि आपलं बिनधास्त हसणं ताकद आहे आपली


आज महिला दिन

आज माझा.. आज तिचा.. माझ्यासारख्या कित्येक मुलींचा /स्त्रियांचा दिवस 

परंतु मला नेहमी वाटते की 

समाजात वावरताना माझ्यामधली 'मी', आणि 

तिच्यामधली, 'ती', कधीच हरवता कामा नये 

कारण माझा, तिचा आनंद स्वतःमध्ये चं आहे 

स्वतःचा आनंद फक्त वेचून घ्यायला हवं


एक मुलगी, एक स्त्री म्हणून बंदिनी न होता

तिने तिच्या स्वप्नांना कवेत घेऊन मुक्तपणे विहरायला हवं

एक स्त्री म्हणून 

एक मुलगी म्हणून 

आपण आपलं आयुष्य सेलिब्रेट करायंला हवं..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract