STORYMIRROR

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Classics

3  

Rutuja kulkarni

Abstract Tragedy Classics

स्त्री व्यथा

स्त्री व्यथा

1 min
184

गर्भामधूनचं सुरु झालेली, 

तिच्या संघर्षाची कथा असते

प्रत्येक स्त्री च्या हास्यामागे, 

दडलेली एक वेदनायक व्यथा असते


जन्माआधीचं सुरु होते, 

तिची पहिली लढाई

अस्तित्व स्वतःचे उभारयां, 

ती झेलते निखाऱ्यांची ज्वाळी


जन्मानंतर सुरु होतो, 

दुसऱ्या लढाईचा प्रवासं. 

वंशाची पणती होऊन,

घर उजळंवन्याचा तिचा ध्यासं. 


शिक्षणासाठी सुरु होते,

 तिची तिसरी लढाई. 

आप्तजनांचा विरोध, 

अगदी निमुटपणे गिळंत जाई


किशोरवयात सुरु होते, 

तिची चौथी लढाई

समाजाच्या नजरांपासून ती, 

स्वतःचे रक्षण कराया उभी राही


संसारानंतर सुरु होतो, 

प्रवासं पाचव्या लढाईचा 

सासरचे सोसून जाचं, 

जीवन जगण्याचा


आईरूपातं सुरु होते, 

तिची सहावी लढाई

मुलांच्या सुखासाठी झगडताना, 

ती स्वतः चं झिजून जाई


मृत्यू च्या क्षणी ही, 

सुरू असते सातवी लढाई

शेवटचा श्वास ही तिचा, 

सगळ्यांसाठी अडकतं राही


सात लढाईंनी समयुक्त, 

अशी स्त्री ची कथा असते

प्रत्येक स्त्री च्या हास्यामागे, 

दडलेली एक वेदनायक व्यथा असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract