बहिण भाऊ
बहिण भाऊ
तुझं माझं जमेना,
तुझ्यां वाचून करमेना,
असेचं गोड ते बंधन असते.
बहिण भावाचे प्रेमं,
जरा अजबचं असते.
लहान किंवा मोठा असो,
भावाचेच नेहमी राज्यं असते.
बहिणीला खोचंक बोलणे,
हेचं त्याचे कामं असते.
दुसऱ्यांचे कौतुक तर,
बहिणीची थटटा असते.
लवकर जा सासरी अशी,
त्याची नेहमीचीचं वाचां असते.
परंतु सासरी जाता बहिण,
जो सर्वांतं जास्तचं रडतं असतो.
बहिणीच्या फोटोला तो,
हलकेच मिठी मारतं असतो.
एकमेकांनाशिवाय त्यांचे,
जीवन खरचं अर्धेे असते.
बहिण भावाचे तरलं नाते,
खरचं खूप गजबचं असते...
