तू भासतो
तू भासतो
तू भासतो अगदी क्षितिजापरी
नजरेत उरुन आसवांंवरी.
तू भासतो अगदी पावसापरी
सर ओसरुन मन चातकापरी.
तू भासतो त्या सलील लाटेपरी
चिंबावूनी मी शुष्क करकरी.
तू भासतो दवातील मोत्यापरी
नीर होऊन उरतो रिक्त करी.
तू भासतो श्रावणातील इंद्रधनूपरी
डोळेभर दिसुनही उरतो उरी.
तू भासतो निशा स्वप्नापरी
माझाच असूनही आठवात उरी.
स्मरणात ठेव तू माझा नसला जरी
प्रतिबिंब तुझेच हृदय कपारी.

