तू ओलेचिंब भिजावे..
तू ओलेचिंब भिजावे..
तू ओलेचिंब भिजावे
मी नकळत तुला पहावे
सोबतीने तुझ्या सखे
सूर मनाचे जुळावे..
गालावरचा थेंब
ओठावर आला
तुझ्या सौंदर्याची
प्रचिती देऊन गेला..
थंड,गार झुळूक ही
स्पर्शूनी तुला जाते
कोसळणाऱ्या धारा
भान हरपुनी टाकते..
आपण दोघे एकमेकांत
समरूप होऊन जावे
तू ओलेचिंब भिजावे
मी नकळत तुला पहावे

