खेळ हा लपाछपीचा
खेळ हा लपाछपीचा
कसा खेळ हा लपाछपीचा
होते चुकामूक दोष कुणाचा ।
विलंब होतो थोड्या क्षणाचा
छळ होतो निर्दोश मनाचा ।
हवा घडीभर वेळ सुखाचा ।
नको लवलेश त्यात दुःखाचा ।
जीवनात ऊन पाऊस कधी वारा
आसरा मज आहे सावलीचा ।
