नातं खास आहे
नातं खास आहे
एकमेकांशी आम्ही बोलत नाही
पण नातं खास आहे..
एकमेकांची ओढ ही नाही
पण नातं खास आहे..
एकमेकांची आठवण त्याहून येत नाही
पण नातं खास आहे..
एकमेकांची काळजी ही नाही
पण नातं खास आहे..
अबोला रुसवा दुरावा ह्यातलं काही नाही
पण नातं खास आहे..
दूर गेलो नाही गेलो काही फरक पडत नाही
पण नातं खास आहे..
मैत्री प्रेम आकर्षण आणि सवय तर त्याहून नाही
पण नातं खास आहे..
कधीच भेटलो नाही किंवा पुढे भेटणार ही नाही
पण नातं खास आहे..

