STORYMIRROR

Bhagyashri Chavan Patil

Action Inspirational Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Action Inspirational Others

हरवत चालला आहे

हरवत चालला आहे

1 min
207

वासुदेव आला हो 

वासुदेव आला


हे गीत ऐकायला खूप

कमी मिळते आहे..


भल्या पहाटे येवून ओवी गावून

दिवस छान करणारा तो कुठे आहे..


दारावर येणारा देवदूत कुठेतरी 

दिसेनासा झाला आहे..


आई पदरात दान घाल ग हे गोड आपुलिकीचे 

बोल ऐकायला कमी येत आहे..


कुतुहुल म्हणून पाहणारी लहान

मुलांना अनोळखी वाटतो आहे..


पंढरीच्या वारीत हमखास दिसतो

पण गावी दिसेनासा झाला आहे..


त्याच मागणारा गाऱ्हाणं आणि आशीर्वाद

कुठेतरी आपले चुकले असे वाटते आहे..


कधी पुस्तकात तरी कधी वारीत दिसतो

आपला असून अनोळखी वाटतो आहे..


परत एकदा ये तुझी ओवी भक्ती गीत

आम्हा सर्वांना परत ऐकू येऊ दे असे वाटते आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action